Mon. Jul 13th, 2020

नाशिकच्या अडगावकर सराफाच्या दुकानात हजारो गुंतवणूकदारांचा गोंधळ

गुंतवणुकीच्या नावाखाली नाशिकमध्ये फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. नाशिकच्या आडगावकर सराफने ‘सुवर्णसंधी’ या नावाने योजना सुरू केली होती. या योजनेत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पैसे गुंतवले. मात्र कालावधी संपून देखील त्यातील पैसे, दागिने पुढील सहा महिने उलटूनही गुंतवणूकदारांना मिळाले नाहीत. तेव्हा आज कॅनडा कॉर्नर येथील आडगावकर सराफ शॉपमध्ये हजारो गुंतवणूकदारांनी मोठा गोंधळ घातला. परतावा आणि मुद्दलही मिळत नसल्यानं गुंतवणूकदार संतप्त झाले.

घटनास्थळी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहचले.

जो पर्यंत पैसे अथवा दागिने मिळत नाही तोपर्यंत येथून न जाण्याचा निर्णय गुंतवणूकदारांनी घेतला.

गुंतवणूकदार 11 महिने सलग हप्ता भरून बाराव्या महिन्याचा हप्ता सराफ भरणार होते.

त्यानंतर बारा महिन्याची होणारी रक्कम अथवा तितक्याच किमतीचे दागिने मिळणार होते.

त्याच बरोबर दागिने ठेवल्यास 10 टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार होते.

मात्र योजना उलटून पाच ते सहा महिने झाले मोबदला मिळत नसल्यानं गुंतवणूकदार संतप्त झाले आहे. याबाबत पोलीस घटनास्थळी पोहचले असले तरी अजून याबाबत तक्रार अथवा गुन्ह्यांची नोंद झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *