Sat. Jun 19th, 2021

पी. चिदंबरम यांना आयएनएक्स प्रकरणी 5 दिवसांची सीबीआय कोठडी

आयएनएक्स मिडीया भ्रष्ट्राचार प्रकरणी पी. चिदंबरम यांना दिलासा मिळाला नाही. चिदंबरम यांचा जामीन अर्ज सीबीआय कोर्टाने फेटाळला आहे.

आयएनएक्स मिडीया भ्रष्ट्राचार प्रकरणी पी. चिदंबरम यांना दिलासा मिळाला नाही. चिदंबरम यांचा जामीन अर्ज सीबीआय कोर्टाने फेटाळला आहे. चिदंबरम यांना पाच दिवसाची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
सीबीआयच्या विशेष कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

पी. चिदंबरम यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी

आयएनएक्स मिडीया घोटाळा प्रकरणी पी. चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. सीबीआयने बुधवारी रात्री चिदंबरम याना अटक केली होती. कायदेतज्ञ कपिल सिब्बल, विवेक तन्खा, नलीनी चिदंबरम. अभिषेक मनू सिंघवी यावेळी कोर्टात हजर होते.चिदंबरम यांना पाच दिवसाची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

महाधिवक्ता तुषार मेहतांनी सीबीआयच्या वतीनं युक्तीवाद केला. चिदंबरम यांच्या ५ दिवसाच्या कोठडीची मागणी त्यांनी केली आहे. मनी लॉडंरीगची हे प्रकरण आहे. सीबीआय़ चार्जशीट दाखल करण्याची तयारी करत आहे. मात्र चिदंबरम चौकशीला सहकार्य करत नाही. ते प्रश्नांना उत्तर देत नाही. चूप बसणे हा घटमात्मक अधिकार आहे. मात्र चौकशीला सहकार्य करणे गरजेचं आहे. सीबीआयच्या वतीनं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी असा युक्तीवाद केला आहे.

सीबीआयच्या तुषार मेहता यांनी चिदंबरम चौकशीला सहकार्य करत नाही. ते प्रश्नांना उत्तर देत नाही. असा युक्तीवाद केला तर कपिल सिब्बल यांनी या प्रकरणाचा तपास पुर्ण झालाय, चार्जशीटचा ड्राफ्ट तयार झालाय, मग आता चिदंबमर यांच्या कोठडीची गरज काय ? असा सवाल केला होता.

पी. चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. कोठडी दरम्यान चिदंबरम यांना दररोज ३० मिनीटे वकील, कुटुंबियाशी भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *