Thu. Jul 18th, 2019

अंबरनाथमध्ये चार्जिंगला लावेलेला आयफॉन 6 चा स्फोट

0Shares

ठाण्यातील अंबरनाथमध्ये आयफॉन 6 मोबाईलचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना अचानक स्फोट झाला. वर्षभरापूर्वी अमित भंडारीने आयफॉन 6 विकत घेतला होता.यामध्ये अमितचे पाय भाजले असून दोन्ही पायांना मोठी दुखापत झाली आहे.

नेमकं काय घडलं ?

अंबरनाथच्या पश्चिम भागातील कोहोजगाव परिसरात रविवारी आयफॉन 6 मोबाईल फोनचा स्फोट झाला आहे.

मोबाईल चार्जिंगला लावला असताना मोबाईलवर आलेले मेसेज वाचत असताना हा स्फोट झाला.

अचानक मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे अमित भंडारीने मोबाईल बाजूच्या गादीवर फेकला.

त्यामुळे फोनसह गादीलाही आग लागली.

यामध्ये अमित भंडारीच्या दोन्ही पाय भाजले असून मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे.

तर अचानक स्फोट झाल्यामुळे अमित अॅपल कंपनीकडे तक्रार करणार असल्याचे म्हटलं आहे.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *