Sat. Jul 31st, 2021

IPL : राजस्थान रॉयल्सकडून मुंबई इंडियन्सचा 4 गडी राखून पराभव!

मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सदरम्यानच्या IPL सामन्यात Mumbai Indians ला पराभव स्वीकारावा लागला.

कसा होता सामना?

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

क्विंटन डी-कॉकने केलेल्या 81 रन्सच्या जोरावर MI ने 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 187 रन्स केल्या.

मात्र राजस्थान रॉयल्सने 19 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवरच 188 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं.

विकेटकीपर आणि बॅट्समन असणारा जोस बटलरने तडाखेबंद खेळी करत मुंबई इंडियन्सकडून विजय खेचून आणला.

बटलरने 43 बॉल्समध्ये 89 रन्स काढल्या.

यामध्ये त्याने 8 दमदार चौकार आणि 7 सिक्सर मारल्या.

अजिंक्य रहाणे याने 37 धावा तर संजू सॅमसन याने 31 धावा काढल्या.

यंदाच्या IPL मध्ये Rajasthan Royals ने दुसऱ्यांदा यशाची चव चाखली.

तर मुंबई इंडियन्सने सातपैकी तीन सामने गमावले आहेत.

त्यामुळे मुंबई 8 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *