Thu. Jul 9th, 2020

हैदराबाद सनरायजर्सची राजस्थान रॉयल्सवर मात, शिखर धवनची झुंजार खेळी

वृत्तसस्था, मुंबई

आयपीएल 2018 मध्ये हैदराबाद सनरायजर्स संघाने राजस्थान रॉयल्सवर मात केलीय. हैदराबादने राजस्थानवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. सलामीवीर शिखर धवनने केलेल्या नाबाद 77 धावांच्या झुंजार खेळीमुळे हैदराबाद संघाला सहज यश मिळवता आले.

shikhar-dhwan.jpg

हैदराबाद सनरायजर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करत राजस्थान रॉयल्सच्या फंलदाजांना चांगलेच आव्हान दिले. हैदराबाद संघाच्या आक्रमक गोलंदाजीसमोर राजस्थान रॉयल्सना केवळ 125 धावा बनवणे शक्य झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *