Tue. Jun 18th, 2019

IPL 2019 : पंजाबचा दिल्लीवर 14 धावांनी विजय

6Shares

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात पंजाबने दिल्लीवर १४ धावांनी विजय मिळवला. मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना झाला यामध्ये नाणेफेक जिंकूण दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात पंजाबने 20 षटकात 167 धावांचे आव्हान दिल्लीपुढे ठेवले होते. पण हे आव्हान त्यांना पेलता आले नाही. दिल्लीने डाव १५२ धावांत आटोपला आणि पंजाबने विजय मिळवला.

14 धावांनी पंजाबचा विजय

नाणेफेक जिंकूण दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

पंजाबच्या डावाची सुरुवातीलाच लोकेश राहुल 15  धावा काढत झेलबाद झाला.

सॅम करन 20  धावा काढून परतला तर पाठोपाठ मयंक अग्रवालही लगेचच बाद झाला.

सर्फराझ खान याने 39  धावा केल्या.तर डेव्हिड मिलर झेलबाद झाला.

मनदीप सिंगने नाबाद 29  धावांची काढल्या.

20 षटकांत पंजाबच्या 9 गडी बाद 166 धावा झाल्या.

दिल्ली कॅपिटल्स 167 धावांच आवाहन

पंजाबचं 167 धावांच आव्हान पेलताना   पृथ्वी शॉ या सामन्यात शून्यावर बाद झाला.

श्रेयसने 22 चेंडूत  5  चौकारांसह 28  धावा केल्या.पंतने २६ चेंडूत ३९ धावा केल्या.

पहिल्याच चेंडूवर मॉरिस बाद झाला.त्यानंतर दिल्लीच्या डावाला गळती लागली

कॉलिन इन्ग्रॅमही सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याने29  चेंडूत 38 धावा केल्या.

त्यानंतर हर्षद पटेल, हनुमा विहारी, संदीप लामीचन्ने,बाद झाले.

करनने आपली हॅटट्रिक पूर्ण केली परंतु दिल्ली 152  धावांपर्यंत पोहचू शकली.

6Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *