मुंबई इंडियन्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या सामन्यात अखेर मुंबईचा विजय

काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या सामन्यामध्ये अखेर मुंबई ने सामना खिशात टाकून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूला पराभवाची परतफेड केली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कायरण पोलार्ड च्या नेतृत्वाखाली प्रथम गोलंदाजी करत मुंबई ने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूला १६४ धावात रोखले. देवदत्त पदिक्कल ह्यांच्या ७४ धावांच्या खेळीमुळे बंगळूरू १६४ धावा काढू शकली. बाकी इतर फलंदाजांनी हवी तशी कामगिरी केली नाही.
मुंबईच्या सूर्यकुमार यादव च्या ७९ धावांच्या मदतीने मुंबई ने सहज सामना खिशात घातला आणि प्ले-आॉफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू चा पराभव झाला असला तरी मुंबई खालोखाल गुण तालिकेत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मुंबई इंडियन्सचे उर्वरित २ सामने हे दिल्ली आणि हैद्राबाद सोबत आहेत. प्ले-ऑफमध्ये जागा निश्चित झाली असली तरी पहिल्या क्रमांकावर राहण्याचा मुंबई नक्कीच प्रयत्न करेल. रोहित शर्मा च्या अनुपस्थितीमध्ये संघ कशी कामगिरी करेल अशी शंका असताना चांगली कामगिरी करत मुंबई सध्या गुण तलिकेच्या शिखरावर विराजमान झाली आहे.