मुंबई इंडियन्स आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर पडली भारी
मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला…

दुबई – मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर भारी पडली. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला आहे. आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
दुबईच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होतं. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने ६८ धावांची तडाकेबंद खेळी केली. तर इशान किशनने नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. मुंबईचे हे पाचवे आयपीएल विजेतेपद ठरले.