प्लेऑफ खेळणारा चौथा संघ कुठला असेेल ?
आज कोण बाजी मारणार…

आयपीएलमध्ये रोजचे सामने होतात आणि त्यात रोज कुणी विजयी होतं तर कोणाचा पराभूत होतं. 5 नोव्हेंबरपासून आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांना सुरुवात होणार आहे. अजूनही प्लेऑफ खेळणारा चौथा संघ कुठला असेेल हे अजून ठरले नाही. त्यासाठी आज होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुध्द सनराईजरस हैद्राबाद सामन्याची वाट बघावी लागणार आहे.
मुंबई सध्याला गुणतालिकेत अव्वल असून मुंबई, दिल्ली आणि बंगळूरू ह्यांनी अनुक्रमे प्लेऑफमधे आपली जागा निश्चित केली आहे. उर्वरित जागेसाठी सनरायझर्स हैद्राबाद आणि कोलकता नाईट रायडर्स ह्यापैकी एकाला संधी भेटू शकते.
बंगळूरू आणि कोलकाता ह्या दोघांनी देखील ७ सामने जिंकून १४ गुण मिळवले आहेत तर हैदराबाद १२ गुणांवर आहे.आजच्या सामन्यामध्ये हैद्राबाद जिंकली तर हैद्राबाद संघाचे देखील १४ गुण होतील. मात्र नेट रन रेट पाहता कोलकता चा नेट रण रेट सर्वात कमी आहे. त्यामूळे जर आजचा सामना हैद्राबादने खिशात घातला तर कोलकाताचा आयपीएलचा प्रवास इथेच संपेल.
बंगळूरू मात्र ३ की ४ थ्या स्थानावर येईल हे हैद्राबाद ठरवू शकते परंतु बंगळूरू प्लेऑफ खेळणार हे निश्चित झाले आहे.जर मुंबई इंडियन्सने हैद्राबादला हरवलं तरच कोलकाताला जीवनदान भेटेल मात्र हैद्राबाद जर आजचा सामना जिंकली तर कोलकाताला घरचा रस्ता धरावा लागेल.त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये कोलकाताचे चाहते देखील मुंबई इंडियन्सला पाठिंबा देताना दिसतील.
यापुर्वीच मुंबई विरुध्द हैद्राबादमध्येे झालेल्या सामन्यात मुंबईने बाजी मारली होती. त्यामुळे मुंबईचे पारडे आज जड असू शकते. प्लेऑफचे तिकीट मिळणार कुणााला मिळणार आणि कोणाला घरचा रस्ता पकडावा लागणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आज रात्री पर्यंत वाट बघावी लागणार.