Jaimaharashtra news

राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून डेव्हिड वॉर्नर बाहेर

आयपीएल २०२१ मध्ये दोन सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल.

राजस्थान संघातून अनुज रावत पदार्पणाचा सामना खेळत आहे, तर जयदेव उनाडकटला बसवून कार्तिक त्यागीला संघात स्थान देण्यात आले आहे. हैदराबादनेही संघात मोठे बदल केले आहेत. डेव्हिड वॉर्नर, जगदीश सुचीत आणि सिद्धार्थ कौल यांच्या जागी भुवनेश्वर कुमार, अब्दुल समद आणि मोहम्मद नबी यांनी संघात जागा मिळवली आहे.

सनरायझर्स हैदराबादने ६ पैकी केवळ १ सामना जिंकला आहे. या कामगिरीनंतर डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून केन विल्यमसनला कर्णधारपदी नियुक्त केले गेले आहे.

Exit mobile version