IPL 2021 Suspended: भारत सोडताना भावूक झाले परदेशी खेळाडू

IPL 2021 Suspended: इंडियन प्रीमिअर लीगचं १४वं पर्व स्थगित झाला असून ४ मे २०२१ला बीसीसीआयनं हा निर्णय जाहीर केला. अन् आधीच घाबरलेल्या परदेशी खेळाडूंना आता घरी जायचं कसं, असा सवाल पडला होता. बीसीसीआनं विविध क्रिकेट संघटनांशी चर्चा करून परदेशी खेळाडूंना माघारी पाठवण्यास सुरूवात केली आहे तसेच मायदेशात परतण्यापूर्वी परदेशी खेळाडू भावूक झालेला पाहायला मिळत आहेत. डेव्हिड मिलर, फॅफ ड्यू प्लेसिस, कागिसो रबाडा, जॉस बटलर आणि अॅनरिच नॉर्ट्झे यांनी मायदेशात जाण्यापूर्वी भावनिक पोस्ट लिहिली आहे. राजस्थान रॉयल्सचा फलंदाज डेव्हिड मिलर यानंही PPE किट घालून व्हिडीओ पोस्ट केली आणि जोस बटलरच्या ट्विटनं सर्वांना भावनिक केलं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं दिले अपडेट्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. RCBनं चार्टर्ड फ्लाईट्सची सोय केली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदिवला रवाना झाले तर न्यूझीलंडचे खेळाडू ऑकलंडला चार्टर्ड फ्लाईट्सनं रवाना झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मुंबई आणि दोहा मार्गे जोहान्सबर्गला जाणार आहेत.

Exit mobile version