Mon. Jul 26th, 2021

IPL 2019: रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी एका मैदानावर

आयपीएलच्या अंतिम लढतीत मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपरकिंग्ज असा सामना रंगणार आहे. या दोन्ही संघ प्रत्येकी तीन-तीन वेळा आयपीएल विजेते ठरले आहेत. आता यावर्षी कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. यावेळी मुंबई इंडियन्स-चेन्नई यांच्यात दोन वेळा लढत झाली आहे. आणि विशेष म्हणजे या लढतीत तिन्ही वेळा मुंबईचा चेन्नईचा विजय झाला आहे. दोन्ही संघाचे चाहते या सामन्याची आतुरतेने वाट बघत आहेत. हा सामना रविवारी राजीव गांधी स्टेडियम हैदराबाद मध्ये होत आहे.

रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी एका मैदानावर

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी रणनिती आखण्यात तरबेज आहे.

रोहितला सचिन तेंडुलकर आणि जयवर्धनेसारख्या दिग्गजांचं मार्गदर्शन मिळालं आहे.

दोघेही मैदानावार खेळत असताना अतिशय संयमीपणे खेळतात.

या दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत तीन वेळा फायनल लढती झाल्या आहेत.

या लढतीमध्ये दोन वेळा मुंबईचा तर एकदा चेन्नईचा विजय झाला आहे.

जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा आणि हार्दिक पंड्या हे मुंबईचे उत्तम गोलंदाज आहेत.

रोहित शर्मा, डी कॉक, सूर्यकुमार यादव, पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि कृणाल हे मुंबईचे फलंदाज आहे.

चेन्नईत शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, ब्राव्हो, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनीसारखे दिग्गज फलंदाज आहेत.

गोलंदाज दीपक चहर,शार्दुल ठाकूर हरभजन सिंग, इम्रान ताहिर हे जबरदस्त गोलंदाज चेन्नईकडे आहेत.

या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *