Jaimaharashtra news

#Coronavirus चा परिणाम, IPL स्पर्धा ढकलली पुढे

Corona Virus चा फटका IPL लादेखील बसला आहे. 29 मार्चपासून सुरू होणारी Indian Premier League ही बहुप्रतिक्षित Cricket स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना दाखल झाल्यामुळे यंदा IPL रद्द करण्यात यावी अशी सूचना खरंतर BCCI ला करण्यात आली होती. मात्र IPL रद्द झाल्यास मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती होती. त्यामुळे यंदा IPL 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

आता 29 मार्चला सुरू होणारं IPL थेट 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलंय. यासंदर्भात Teams च्या मालकांनाही कल्पना देण्यात आल्याचं BCCI च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

जगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे. 110 देशांत पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. भारतातही 80 जणांना Corona Virus झाल्याचं पुढे झालंय. अशा परस्थितीत IPL भरवल्यास प्रेक्षकांची संख्या कमी असण्याची शक्यता आहे. तसंच लोकांनी उत्साहाने गर्दी केली, तरीदेखील कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे.  त्यामुळेच यंदा केंद्राने देखील IPL स्पर्धा घेऊ नये, असा सल्ला दिला होता. IPL आयोजित करायची असल्यास रिकाम्या स्टेडियममध्ये स्पर्धा घेण्यात यावी, जेणेकरून लोकांमध्ये कोरोनाचा फैलाव होणार नाही, अशी अट सरकारने घातली होती. त्यामुळे यंदाची IPL 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Exit mobile version