Sun. Jun 7th, 2020

#IPL2018 CSKचे पुढील सामने पुण्यात

जय महाराष्ट्र न्युज, पुणे 

महाराष्ट्रातील सीएसकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचे सामने कावेरी पाणी वादामुळे रद्द झाल्यामुळे पुढील सामने चेन्नई ऐवजी पुण्यामध्ये होणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव होमग्राऊंडवरील सामने अचानकपणे रद्द करावे लागले. तामिळनाडूत कावेरी आंदोलन पेटल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला.

याआधीही पुण्यामध्ये आयपीयलचे अनेक सामने झाले आहेत व प्रेक्षकांकडूनही त्यास भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा पुढील सामना पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडिअमवर 20 एप्रिलला आर अश्विन कर्णधार असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबशी होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *