Fri. Jun 5th, 2020

#IPL2018 पंजाबचे 19.2 ओवरमध्ये 155 धावा, सर्व गडी बाद

आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये होत असून आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या षटकात राहुलने दोन षटकार आणि एका चौकारासह तब्बल 16 धावांची वसूली केली. उमेश यादवने आपल्या चौथ्या षटकात बंगळुरुच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले. पण त्यानंतर राहुल आणि करुण नायर यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने राहुलला सर्फराज खानकरवी झेलबाद केले. राहुल बाद झाल्यावर पंजाबला नायरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो 29 धावांवर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने स्टोईनिसला बाद करत पंजाबला सहावा धक्का दिला.

पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने पडछडीनंतर संघाचा डाव सावरला. ख्रिस वोक्सने अॅड्र्यू टायला विराट कोहलीकरवी झेल बाद करत पंजाबला आठवा धक्का दिला. अॅड्र्यूला सात धावा करता आल्या. ख्रिस वोक्सने अॅड्र्यू टायला विराट कोहलीकरवी झेल बाद करत पंजाबला आठवा धक्का दिला. अॅड्र्यूला सात धावा करता आल्या. बंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आर. अश्विनला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. अश्विनने 21 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 33 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

19.2 ओवरमध्ये 155 धावा करून पंजाबचे सर्व गडी बाद झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *