आयपीएलचे दोन आठवड्याचे वेळापत्रक जाहीर

आयपीएलच्या बाराव्या सीझनचा पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी २३ मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुका आणि आयपीएलच्या तारखा एकाचवेळी होत असल्याने अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे आयपीएल देशाबाहेर खेळण्याचा विचार करण्यात येत होता. मात्र आयपीएल आता देशातच खेळाणार असल्याचे समोर आले आहे. या सीझनची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून होणार असून त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाबरोबर होणार आहे.

Exit mobile version