Tue. Oct 26th, 2021

अमेरिकेच्या तळांवर इराणचा रॉकेट हल्ला, भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणार वाढ

बुधवारी पहाटे इराणचा अमेरिकेच्या दोन तळांवर हल्ला केला. एन अल असद आणि इरबील या अमेरिकेच्या दोन तळांवर इराणने रॉकेट हल्ला चडवला.तब्बल 12 रॉकेटचा मारा इराणने अमेरिकेवर केला. अमेरिकेचे 80 सैनिक या हल्ल्यात ठार झाले.

या हल्ल्यामुळे जागतिक बाजारात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या दरात 4 टक्यानी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचा प्रति बॅरल दर 65 डॉलर्स झाला असून याचा परिणाम भारतावरही होणार आहे. भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर याचा परिणाम होईल. सोने चांदीच्या दरांवरही याचा परिणाम होईल.

इराण कमांडर जनरल कासीम सुलेमानी आणि इराकचा कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांच्या हत्येनंतर इराक मध्ये संताप आहे. अमेरिकेचा बदला घेण्याची शप्पथ इराकने घेतली आहे. इराणनं आपण अधिकृतरित्या हल्ला केल्याचं जाहीर केलं.
अमेरिकेच्या सैनिकांच्या सुरक्षिसाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील असं अमेरिकेने सांगितलं आहे. तर संपूर्ण हल्ल्याची व्यवस्थित माहिती घेतली जात आहे,असं पेटॉगॉन यांच्याकडून सांगण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *