Wed. May 19th, 2021

पाकिस्तानात घुसून कारवाई करू; इराणची पाकिस्तानला धमकी

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ला करत उद्धवस्त केले आहे. पाकिस्तानने दहशतवादी संघटन्यांवर कारवाई करावी अशी मागणी जगभरातील देशांनी केली. मात्र इराणने चक्क दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची धमकीच दिली आहे.

इराणची पाकिस्तानला धमकी –

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कमांडचे जनरल कासीम सोलेमनी यांनी पाकिस्तान सरकारला इशारा दिला आहे.

कासीम सोलेमनी म्हणाले की, तुमच्या शेजारच्या देशांमध्ये अशांती तुमच्यामुळे पसरली आहे ?

तुमच्याकडे जर परमाणू बॉम्ब असतानाही दहशतवाद्यांचा तळ उद्धवस्त का करत नाही ?

तसेच ते करण्यात अपयशी का ठरत आहेत ?

इराण संसदेच्या विदेशी धोरण विभागाचे अध्यक्ष हेशमातोल्लाह फलाहतपिशेह यांनी पाकिस्तान आणि इराण सीमेवर भिंत घालण्याची योजना सांगितली आहे.

तसेच जर पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कारवाई केली नाही तर इराण घुसून दहशतवादी संघटनेवर कारवाई करेल अशी धमकी दिली आहे.

भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले इराणच्या दौऱ्यावर जाणार होते.

मात्र भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असल्यामुळे दौरा पुढे ढकलण्यात आला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *