Tue. Mar 9th, 2021

दिवंगत अभिनेता इरफान खानचा यांचा शेवटचा चित्रपट पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित…

इरफान खान यांचा शेवटचा चित्रपट.. सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स २०२१ मध्ये प्रदर्शित होणार….

दिवंगत अभिनेता इरफान खान यांनी आपल्या अभिनय जोरावर प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीचं छाप सोडली. शिवाय त्यांनी बॉलिवू़डमध्ये नाही तर त्यांनी हॉलिवूडमध्ये काम करून एक वेगळीचं ओळख जगात निर्माण केली. इरफानने छोट्या पडद्यावरुन आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती मात्र मेहनतीच्या जोरावरच यांनी यश संपादित केलं. इरफान खान यांचा शेवटचा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं.

तरण आदर्श यांनी ट्विटरवर लिहिलं, “इरफानचा शेवटचा चित्रपट.. सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स – २०२१ मध्ये प्रदर्शित होणार.” द सॉंग ऑफ स्कॉर्पियन्स या चित्रपटात इरफान खानने एका व्यापाराची भूमिका साकारली आहे. शिवाय या चित्रपटात इराणी अभिनेत्री गोलशिफ्तेह फरहानी आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहीदा रहमान यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये ७०व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल २०१७ मध्ये हा चित्रपट प्रीमीयर झाला होता. आता हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. इरफान खानने २९ एप्रिल रोजी मुंबईच्या कोकिलाबेन धिरूभाई अंबानी या रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *