Mon. Jan 17th, 2022

इरफान खान यांच्या मुलानी केली भावनीक पोस्ट

इरफान खान हे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. त्यांचं 29 एप्रिल 2020 साली कर्करोगामुळं निधन झालं. त्याच्या पहिली पुण्यतिथी निमित्तानं जगभरातील चाहत्यांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. इरफानचा मुलगा बाबील देखील आपल्या वडिलांच्या आठवणीनं भावुक झाला आहे. त्यानं एक हृदयस्पर्शी फोटो शेअर करुन वडिलांच्या स्वभावाचं वर्णन केलं आहे. बाबीलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर इरफानचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात इरफान खान हे मोडलेलं टेबल दुरुस्त करताना दिसत आहे. या पोस्टवर बाबीलनं त्याच्या मनातील भावना व्यक्त करत वडिलांसाठी काही लिहिलंय ‘किमो थेरेपी तुम्हाला आतून जाळून टाकते. त्यामुळं तुम्ही इतर गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करता. तुम्ही स्वत:साठी टेबल बनवायचा. स्वत:चे जर्नल्स स्वत: लिहायचा. तुमच्या प्रत्येक कामात एक पवित्रता होती. तुमची जागा दुसरं कोणी कधी घेऊ शकणार नाही’.

हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. इरफान खान आज जरी या जगात नाही तरी त्यांचं नाव हे चित्रपटसृष्टीत आजही जिवंत आहे. इरफान खानने भारतीय सिनेसृष्टीत एक वेळीच ओळख स्वताची निर्माण केली होती. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखल्या जायचा. जवळपास 30 वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी हॉलिवूडमध्येही काम केलं. ‘स्लम डॉग मिलेनियर’ या चित्रपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर त्यांना एक नवी ओळख हॉलिवूडमध्ये देखील मिळाली. त्यानंतर अनेक हॉलिवूडच्या ऑफर त्यांना मिळाले. आज ते या जगात नाही मात्र तरीही त्यांच्या चाहत्यांच्या मनात आजही ते जिवंत आहे. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी 2011 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *