Tue. Jul 27th, 2021

जैश-ए-महंम्मदचा म्होरक्या मौलाना अज़हर मसूदचा मृत्यू?

जैश ए मोह्म्मद चा प्रमुख मसूद अजहर याचा पाकिस्तानात किडनीच्या आजाराने मृत्यू झाल्याचं वृत्त सध्या सर्वत्र पसरलं आहे. या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र काही दिवसांपासून लिव्हर कॅन्सरने तो बेजार असून त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकीकडे भारताच्या Air Strike  दरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याची कुजबूज सुरू आहे. तर दुसरीकडे त्याच्या किडनी फेल झाल्याने मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. तर लिव्हर कॅन्सरमुळे 2 मार्चला त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र पाकिस्तान हे कधीही कबूल करणार नाही.

पाकिस्तान चे परराष्ट्र मंत्री शाह मोहमद कुरेशी यांनी मसूद अजहर हा पाकिस्तान मध्येच असून त्याची तब्बेत अत्यंत नाजूक असल्याचा खुलासा काही दिवसापूर्वी केला होता. मात्र तो या अवस्थेत घराबाहेर पडू शकत नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

इस्लामाबाद येथून मिळणाऱ्या माहितीनुसार मसूद वर रावळपिंडी इथल्या पाकिस्तानी आर्मी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून रोज त्याचे डायलिसिस सुरू होती.

किडनीच्या आजाराने मृत्यू झाल्याची चर्चा, अजूनही बातमीला कोणताही अधिकृत दुजोरा नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *