Wed. Jun 26th, 2019

ईशा अंबानीच्या विवाह सोहळ्यासाठी दिग्गजांची हजेरी

0Shares

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळख असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. हा भव्यदिव्य विवाहसोहळा उदयपूरमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक प्रसिद्ध उद्योग, मनोरंजन, राजकारण या क्षेत्रातील मंडळी उदयपूरमध्ये दाखल होत आहेत.

अमेरिकेतील नेत्या हिलरी क्लिंटन यांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. यासोबतच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादव, सचिन तेंडुलकर, अभिनेत्री प्रियांका चोप्रा-निक, शाहरुख खान, आमीर खान, सलमान खान यांच्यासह बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत.

इशा आणि आनंद यांचे लग्न 12 डिसेंबरला होणार असले तरीही विवाह सोहळ्यातील इतर विधींना सुरुवात झाली आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: