Fri. Jan 21st, 2022

मुंबईतील आणखी एक तरुण ISIS मध्ये सहभागी झाल्याचा संशय

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

मुंबईतील आणखी एक तरुण दहशतवादी संघटना आयसिस मध्ये सहभागी झाल्याची शंका वर्तविण्यात येत आहे.  

 

माहिममध्ये राहणार एक तरुण मागील दोन महिन्यांपासून घरी परतला नसल्याची माहिती समोर येत आहे.  सैय्यद अशरफ इरफान अहमद असे या तरुणाचं नाव आहे.

 

हा तरुण कुठे आहे याचा थांगपत्ता लागलेला नाही. या तरुणाच्या बेपत्ता होण्याने एटीएस सतर्क झाली आहे.  

 

अशरफ जात असलेल्या सायबर कॅफेमध्येही त्यांनी चौकशी सुरु केली. तो ज्या सायबर कॅफेमध्ये जात होता, त्या सायबर कॅफेची हार्ड डिस्कही एटीएसने ताब्यात घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *