Tue. Dec 7th, 2021

इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष

इस्रायल आणि पॅलेस्टाईन या देशांमध्ये पुन्हा संघर्षाला तोंड फुटले असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरु झाले आहेत. सोमवारी हमासने इस्रायलच्या दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये ९ लहान मुलांसह २० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये एकाच दिवसात इतका रक्तपात झाल्याची ही पहिलीच घटना आहे, असे पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. तर पॅलेस्टाईनने हल्ला केल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावे लागले, असे इस्रायलचे म्हणणे आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघटनेने आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत संयुक्त राष्ट्रसंघटनेने इस्रायलला काही सूचना केल्या.

‘इस्रायलने संयम बाळगावा. तसेच ऐतिहासिक पवित्र स्थळांचा आदर करण्यात यावा’, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *