जेरुसलेममधील हल्ल्यात भारतीय महिलेचा मृत्यू

जेरुसलेम अल अक्सा मशिदीत पॅलेस्टाइन आणि इस्रायलच्या सुरक्षा दलामधील चकमकीने आता रौद्र रुप धारण केलं आहे. दोन्ही बाजूंनी रॉकेट हल्ला केला जात आहे. यामध्ये आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून यात एका भारतीय महिलेचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सौम्या संतोष असं या महिलेचं नाव असून ती गेल्या सहा वर्षापासून इस्रायलमध्ये राहत होती.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, हमासनं रहिवाशी भागात जवळपास १३० रॉकेटचा हल्ला केला. तर जेरुसलेममध्येही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. या हल्ल्यात भारतीय महिलेचा मृत्यू झाला. भारतात इस्रायलचे राजदूत डॉक्टर रॉन मलका यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे.

तसेच सौम्या संतोष यांच्या कुटुंबियाच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं म्हणत इस्रायलचे राजदूत डॉक्टर रॉन मलक यांनी शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version