Tue. Dec 7th, 2021

इस्राईलचे हमासला जोरदार प्रत्युत्तर

इस्त्रायल: इस्त्रायली हवाई हल्ल्यात बुधवारी मध्य गाझा शहरातील उंच इमारती पाडण्यात आल्या. गाझामध्ये झालेल्या हल्ल्यात 48 पॅलेस्तानी ठार झाले असल्याचं वृत्त आहे. यात 14 लहान मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे. 86 मुले आणि महिलांसह 300 हून अधिक जखमी झाले आहेत. गाझा इमारत कोसळतानाचे दृश्य इस्त्रायली टीव्ही वाहिन्यांवरून प्रसारित केले गेले होते. इस्राईलच्या हल्ल्याला उत्तर देताना हमासने इस्रायलवर 130 रॉकेट प्रक्षेपित केल्याचं वृत्त आहे.

इस्रायलकडून गाझा पट्टीत हवाई हल्ले करण्यात आले. या आधी हमास आणि इतर अतिरेकी संघटनांनी इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि बीरशेबा या शहरावर हल्ले केले होते. याला जोरदार प्रत्युत्तर देताना इस्रायलकडून केलेल्या हल्ल्यांमध्ये गाझा पट्टीतील एक बहुमजली इमारत उद्ध्वस्त करण्यात आली आहे. हमासच्या अनेक रॉकेट लाँच साईट्स आणि अतिरेकी नेत्यांची घरे या हल्ल्यामध्ये नष्ट करण्यात आली आहेत.

इस्रायलच्या दिशेने डागलेल्या क्षेपणास्त्रांचा हवेतल्या हवेतच खात्मा केला जात आहे. त्यासाठी इस्रायलने आपल्याभोवती निर्माण केलेले आयर्न डोम हे सुरक्षा कवच परिणामी ठरत आहे.

काय आहे इस्रायलची आयर्न डोम यंत्रणा ?

  •  शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी ही यंत्रणा आहे.
  • राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स आणि इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज या दोन इस्रायली कंपन्यांनी अमेरिकेच्या मदतीने ही सुरक्षा यंत्रणा विकसित केली आहे
  •  इस्रायलच्या दिशेने येणारी क्षेपणास्त्रे, तोफगोळे आणि छोटे रॉकेट्सर्स आयर्न डोम तंत्रज्ञानाच्या साह्याने हवेतल्या हवेतच नष्ट केली जातात.
  • हवाई हल्ल्यांपासून आपल्या शहरांचे, नागरिकांचे रक्षण व्हावे या उद्देशाने इस्रायलने २०११ मध्ये आयर्न डोम यंत्रणेचा सुरक्षा दलांमध्ये समावेश केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *