Fri. Dec 3rd, 2021

ISRO चे प्रमुख के. सिवन यांच्या भावना अनावर, पंतप्रधानांनी ‘असं’ केलं सांत्वन!

मिशन चांद्रयान 2 ला यशाने हुलकावणी दिल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ISRO मधील शास्त्रज्ञांना संबोधित केलं. आपल्या भाषणातून त्यांनी शास्त्रज्ञांचं मनोबल वाढवायचा प्रयत्न केला. विज्ञानात अपयश नसतंच, तर प्रयोग असतात, असं ते म्हणाले. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग असं म्हणत मोदी यांनी शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. तसंच पुढच्या प्रयोगासाठी शुभेच्छाही दिल्या.

या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशनमध्ये योगदान असलेल्या प्रत्येक शास्त्रज्ञांची भेट घेत हात मिळवला. या वेळी ISRO चे प्रमुख के. सिवन यांना मात्र आपल्या डोळ्यांतील अश्रू लपवता आले नाहीत. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यावेळी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी के सिवन यांना आलिंगन दिलं. मोदींच्या खांद्यावर डोकं ठेवून सिवन यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मोदी यांनी सिवन यांची पाठ थोपटत त्यांचं सांत्वन केलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *