Sun. Aug 18th, 2019

इस्त्रोची गगनभरारी ! 8 देशांचे 30 उपग्रह यशस्वीपणे अवकाशात झेपावले

0Shares

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोकडून गुरुवारी पीएसएलव्ही सी-43″ अंतराळ यानाच्या मदतीने सकाळी 10 वाजता 8 देशांचे 30 उपग्रह यशस्वीपणे अवकाशात झेपावले. पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या हायसिस या भारतीय उपग्रहासहीत 8 देशांच्या 30 उपग्रहांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे 30 उपग्रहांपैकी 23 उपग्रह अमेरिकेचे आहेत. अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, मलेशिया, नेदरलँड आणि स्पेन या 7 देशांचे उपग्रहदेखील सोबत आहेत.

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही – सी 43 चे गुरुवारी सकाळी 9.58 वाजता प्रक्षेपण करण्यात आले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *