जीएसएलव्ही मार्क-3च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो आणखी एका मोहीमेसाठी सज्ज
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जीएसएलव्ही मार्क-3च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो आणखी एका मोहीमेसाठी सज्ज झाला आहे.
इस्रोचं पीएसएलव्ही प्रक्षेपक 23 जूनला 31 नॅनो उपग्रह घेऊन अवकाशात झेपावणार आहे.
31 पैकी 29 उपग्रह हे ऑस्ट्रीया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, फ्रान्स, फिनलँड अशा 14 देशांचा समावेश आहे.
याशिवाय तामिळनाडूतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले एक नॅनो उपग्रहदेखील अवकाशात झेपावणार आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीलाच इस्रोनं जीएसएलव्ही-मार्क 3 च्या साह्यानं जीसॅट-19 हे उपग्रह अंतराळात पाठवले होते.
या यशस्वी प्रक्षेपणानंतर 23 जूनला इस्रो आणखी एका मोहीमेसाठी सज्ज झाला आहे.
23 जूनला 9 वाजून 29 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील लाँचपॅडवरुन हे प्रक्षेपण होणार आहे.
कार्टोसॅट-2 या भारतीय उपग्रहाचे वजन 712 किलो असून कार्टोसॅट- 2 या मालिकेतील हे सहावे उपग्रह आहे.