Wed. Jun 26th, 2019

उपग्रहातून कसा दिसतो कुंभमेळा ?; इस्रोने जारी केले छायाचित्र  

0Shares

कुंभमेळा म्हटलं की डोळ्यासमोर येतो गर्दीचा महापूर. कुंभमेळ्यात लाखो भाविक उपस्थिती दर्शवतात. प्रयगराजमध्ये अर्ध कुंभमेळ्याला सुरूवात झाली आहे. लाखो भाविकांनी येथे उपस्थिती दर्शवली आहे. येथील हजारो फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहे. यामध्ये इस्रोनेही प्रयागराज कुंभचे काही फोटो पोस्ट केले आहेत. हा अर्धकुंभ उपग्रहातून कसा दिसतो? याचा विचार केल्यास आपल्याला डोळ्यांसमोर फक्त अंधार येत असेल.. खाली दिलेलल्या फोटोवर एक नजर टाका म्हणजे तुम्हाला उपगृहातून कुंभ कसा दिसतो हे समजेल… रिपोर्टनुसार, इस्रोतून भारतीय रिमोट सेंसिंग सॅटेलाइट कार्टोसॅट-2 मधून हे फोटो घेतले आहेत. आपल्या अधिकृत ट्विटरवर गुरुवारी इस्रोने हे फोटो पोस्ट केले आहेत.

भारतातील कुंभमेळा जगभरात प्रसिद्ध आहे. देश-विदेशातून भाविक येथे हजेरी लावतात.  मिळालेल्या माहितीनुसार मकरसंक्रातीच्या दिवशी दोन कोटींपेक्षा आधिक भाविकांनी कुंभमेळाव्यात हजेरी लावत गंगा नदीमध्ये स्नान केले होते.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: