Fri. Dec 3rd, 2021

मोहोळ मतदारसंघातील आमदार 4 वर्षं जेलमध्ये, आता विकास करणार कोण?

राज्यातल्या प्रमुख मतदारसंघापैकी लक्षवेधी मतदारसंघ म्हणून मोहोळ राखीव मतदारसंघ ओळखला जातो. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड मानला जातो. राखीव मतदारसंघ झाल्यापासून राष्ट्रवादीने स्थानिक उमेदवाराला कधीही संधी दिली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत अटकेत असलेले रमेश कदम यांना संधी देत राष्ट्रवादीने कदम यांना आमदार म्हणून निवडून आणले. मात्र 8 महिन्यातच आमदार रमेश कदम यांना जेलमध्ये जावं लागलं. त्यामुळे मोहोळ मतदार संघाला 4 वर्ष आमदारच नव्हता. अशा परिस्थितीत या मतदारसंघाचा विकास होणार कुठून?

यावेळी मोहोळ मतदारसंघात शिवसेनेकडून स्थानिक उमेदवार म्हणून नागनाथ क्षीरसागर यांना संधी मिळाली आहे.

क्षीरसागर यांच्या रूपाने स्थानिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.

त्यामुळे मोहोळ मतदारसंघातील जनता स्थानिक उमेदवाराला निवडून देईल, अशी आशा शिवसेनेला आहे.

राखीव असलेल्या मोहोळ मतदारसंघात यावेळी देखील राष्ट्रवादीने स्थानिक उमेदवार न देता इंदापूर येथील असलेले यशवंत माने यांना उमेदवारी बहाल केलीय.

तर जामिनावर बाहेर असलेले आमदार रमेश कदम हे अपक्ष म्हणून मोहोळ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

त्यामुळे मोहोळ मतदारसंघातील जनता आता तरी विकासासाठी स्थानिक उमेदवाराला निवडून देणार का हा खरा प्रश्न निर्माण झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *