Mon. May 23rd, 2022

‘प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही’; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

राज्यातील प्रश्नांसह मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून विरोधक महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. दरम्यान विरोधक करत असलेल्या टीकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. मुंबई पालिकेत खुट्ट झाले की, प्रश्नांचा भडीमार केला जातो. महापालिका काय करते? असा सवाल केला जातो. त्यामुळे प्रश्न विचारणे सोपे असेत. प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांच्या हस्ते आज महापालिकेच्या ‘व्हॉट्सऍप चॅट बॉट’ सुविदेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

यावेळी ते म्हणाले, राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप टळले नाही. कोरोना काळात मुंबई पालिकेने खूप कामे केली आहेत. याचे सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले. आपण कौतुक करण्यासाठी काम करत नाहीत. तर कर्तव्य म्हणून काम करत असतो. परंतु पालिकेतून खुट्टं झाले तर पालिकेवर आरोप केले जातात. यावेळी विरोधकांकडून पालिकेवर टीका केली जाते. नगरसेवक, महापौर यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र स्वत: काही करायचे नाही आणि प्रश्न विचारायचे. त्यामुळे प्रश्न विचारणे सोपे असते, कारण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.

1 thought on “‘प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही’; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.