Wed. Jun 29th, 2022

‘महाराजांचा भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी भाजपाची’ – देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशकात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फडणवीसांनी शिवसेनेवर टोला लगावला आहे. काहीजण फक्त भगवा मिरवण्याचे काम करत आहेत, मात्र महाराजांचा भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी भाजपची आहे. त्यामुळे नाशिक मनपात पुन्हा एकदा भाजपचाच भगवा फडकेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कमी होते तरी ते मुघलांशी सामना करायचे. काही जण फक्त भगवा मिरवण्याचे काम करत आहेत. महाराजांचा भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी भाजपची असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, ‘दत्तक म्हटल्यावर इतरांना वाटले आम्ही इथे येऊन बसू आणि दलाली करू. मात्र, दत्तक घेणे म्हणजे दलाली खाणे असे नाही. आमची पदाधिकारी योग्य काम करत आहेत तसेच मुख्यमंत्री असताना नाशिककडे लक्ष दिले. तर जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला.’

‘प्रदूषणमुक्त नाशिक घडवायचे आहे.’

आम्हाला महापालिकेची सत्ता दलाली खाण्यासाठी नाही तर परिवर्तनासाठी हवी आहे. आम्हाला प्रदुषणमुक्त नाशिक घडवायचे आहे. तसेच राज्यसरकारने आडकाठी घातली नाही तर पुढील ३ वर्षांमध्ये निओ मेट्रो सुरू होईल. तर नमामी गोदा योजना कार्यान्वित करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘सरकारने कोरोनाकाळात ऑक्सिजन पुरवलं नाही.’

कोरोना काळात नाशिककरांवर अन्याय झाला असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबई, पुणे येथे राज्यसरकारने कोविंड सेंटर उभारले. तर सरकारने कोरोनाकाळात नाशकात ऑक्सिजनसुद्धा पुरवले नाही. नाशिककरांना ऑक्सिजन मिळावा यासाठी भाजपचे कार्यकर्ते मदतीला धावून आले. नाशिकमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर ऑक्सिजन मिळाले, असे सांगत फडणवीसांनी राज्य सरकार निशाणा साधला आहे.

‘भाजपला एकजुटीने निवडणूक लढवावी लागेल.’

नाशिककरांचा पाठिंबा भाजपसोबत आहे. भाजपविरुद्ध संपूर्ण महाविकास आघाडी आहे. त्यामुळे भाजपला एकजुटीने निवडणूक लढावी लागणार आहे. नगरसेवकांच्या जागी कमी आहेत, भाजपचे तिकीट मिळाले म्हणजे विजय नक्की आहे. त्यामुळे पक्षाने दिलेल्या उमेदवारांना निवडून आणायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.