Mon. Jul 22nd, 2019

70 वर्षाचा आजार 5 वर्षात सुधारणं अशक्य – मोदी

0Shares

लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच संसदेत भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. 70 वर्षाच्या आजाराला 5 वर्षात सुधारणं अवघड असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच 25 जून 1975 साली इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली. यामुळे या दिवशी देशाच्या आत्म्यावर हल्ला केल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

70 वर्षाचा आजार 5 वर्षात कसा बरा होईल ?

70 वर्षाच्या आजाराला 5 वर्षात सुधारणं सोपं नसल्याचे मोदींनी म्हटलं आहे.

इंदिरा गांधी यांनी 1975-77 सालापर्यंत आणीबाणी जाहीर केली होती.

यामुळे देशाच्या आत्म्यावर हल्ला करण्यात आला होता.

संपूर्ण देशाला कारागृह बनवलं होतं.

आणीबाणीचा डाग कधी मिटणार नाही.

आणीबाणीवर चर्चा करणं महत्त्वाचे असल्याचे म्हटलं आहे.

सत्ता जाण्याच्या भीतीने आणीबाणी जाहीर केली होती असेही त्यांनी यावेळी म्हटलं.

पुन्हा अशी वेळ येऊ नये म्हणून यावर चर्चा करणे महत्त्वाचे असल्याचे म्हटलं आहे.

शाह बानो प्रकरणातही कॉंग्रेसने योग्य निर्णय घेतला नाही.

इतर मुद्द्यांवर चर्चा –

मेक-इन इंडियाची खिल्ली उडवून काय मिळणार ? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.

पाणी समस्या सोडवण्यासाठी जलशक्ती मंत्रालय.

देशात पर्यटन सुद्धा मोठी समस्या असल्याने त्यावर भर दिला पाहिजे.

पर्यटन वाढल्यास रोजगारास संधी वाढेल असे म्हटलं.

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: