Gold Price Today: लग्नाच्या सीझनला सुरुवात होण्याआधीच सोन्याच्या दरात नरमाई दिसत आहे आणि त्यामुळे ग्राहक व गुंतवणूकदार दोघांचेही लक्ष या घडामोडींवर आहे. 4 नोव्हेंबर रोजीच्या सकाळच्या ट्रेडिंगमध्ये एमसीएक्सवर सोन्याच्या दरात हलकी घसरण नोंदवली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 डिसेंबर एक्स्पायरी असलेला गोल्ड फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट 1,20,802 रुपये प्रति 10 ग्रॅम या दरात ओपन झाला. यापूर्वीच्या व्यापारदिवशी सोनं 1,21,409 रुपयांवर क्लोज झालं होतं. म्हणजेच जवळपास 600-650 रुपयांनी सोन्यात नरमाई दिसली.
सकाळी साधारण 9.55 च्या सुमारास गोल्ड फ्युचर्स 1,20,760 रुपये या स्तरावर ट्रेड होत होता. ट्रेडिंगच्या सुरुवातीच्या तासात या कॉन्ट्रॅक्टने 1,20,970 रुपयांचा हायलवलही गाठला. म्हणजेच सकाळच्या सेशनमध्ये दर थोडा चढ-उतार करत आहेत पण एकूण चित्र किंमत मागे येण्याचं.
हेही वाचा:Indian Rupee Falls : अमेरिकन डॉलरपुढे रुपया कमजोर! भारतीय चलनावरील दबावाची मुख्य कारणे काय?
सोन्यासोबतच चांदीतही किंमतींमध्ये घसरण दिसत आहे. बातमी लिहेपर्यंत एमसीएक्सवर चांदी 1,47,131 रुपये प्रति किलो या दरात ट्रेड होत होती. दिवसाची ओपनिंग 1,46,466 रुपये होती, म्हणजे साधारण 630 रुपयेपर्यंतची घसरण चांदीतही.
ग्राहक साइट्सनुसार वेगवेगळ्या शहरांतील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) खालीलप्रमाणे आहेत:
दिल्ली :
24 कॅरेट : 1,22,510 रुपये
22 कॅरेट : 1,12,400 रुपये
18 कॅरेट : 91,990 रुपये
मुंबई :
24 कॅरेट: 1,22,460 रुपये
22 कॅरेट: 1,12,250 रुपये
18 कॅरेट: 91,840 रुपये
चेन्नई :
24 कॅरेट: 1,22,730 रुपये
22 कॅरेट : 1,12,500 रुपये
18 कॅरेट: 93,900 रुपये
हेही वाचा: Diet Tips: Trump Tariff : 'भारताने घाईत निर्णय..'; अमेरिकेशी शुल्क वाटाघाटीवर रघुराम राजन यांचा सल्ला
कोलकाता :
24 कॅरेट: 1,22,460 रुपये
22 कॅरेट: 1,12,250 रुपये
18 कॅरेट: 91,840 रुपये
अहमदाबाद :
24 कॅरेट: 1,22,510 रुपये
22 कॅरेट: 1,12,300 रुपये
18 कॅरेट: 91,890 रुपये
लखनऊ :
24 कॅरेट: 1,22,510 रुपये
22 कॅरेट: 1,12,400 रुपये
18 कॅरेट: 91,990 रुपये
नोव्हेंबर हा पारंपारिकरित्या लग्नांचा महिना मानला जातो. भारतात लग्न, ग्रहप्रवेश, शुभकार्य आणि विशेष प्रसंगी सोने-चांदी घेणं हे शुभ मानलं जातं. त्यामुळे दरातील कमी चढ-उतारही लोक काळजीपूर्वक पाहत असतात. सोनं फक्त दागिन्यांसाठीच नव्हे… तर गुंतवणूक म्हणूनही अनेकांनी सुरक्षित पर्याय मानला आहे.