Leave After Breakup: गुरुग्राममधील एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने नुकताच 'ब्रेकअप' झाल्यानंतर रजा मागितली. त्याचा ईमेल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तथापी, कंपनीचे सीईओ जसवीर सिंग यांनी स्वतः हा ईमेल शेअर करत त्याला 'सर्वात प्रामाणिक रजा अर्ज' म्हटलं आहे.
हेही वाचा - हीच खरी श्रद्धांजली!; आईच्या इच्छेसाठी या उद्योगपतीने 290 शेतकऱ्यांचे लाखोंचे कर्ज फेडले
नेमकं काय घडलं?
माझं नुकतंच ब्रेकअप झालं आहे, मी कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मी आज घरून काम करत आहे. मला 28 ते 8 तारखेपर्यंत रजा घ्यायची आहे, असा ईमेल कर्मचाऱ्याने आपल्या सीईओला पाठवला. दरम्यान, सीईओने यावर 'तात्काळ रजा मंजूर,' असं उत्तर दिलं. या उत्तरामुळे सोशल मीडियावर सीईओंचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.
हेही वाचा - टेलरने वेळेवर ब्लाऊज न दिल्याने महिलेने घेतली न्यायालयात धाव; शिंप्याला ठोठावण्यात आला 11,500 रुपयांचा दंड
नेटिझन्सची प्रतिक्रिया -
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर सीईओंच्या संवेदनशीलतेचं आणि कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक होत आहे. एका वापरकर्त्याने लिहिलं की, अशी प्रामाणिकता क्वचितच दिसते!तर दुसऱ्याने मजेशीरपणे म्हटलं, 'लोक लग्नासाठी एवढ्या रजा घेत नाहीत, जितक्या ब्रेकअपसाठी घेत आहेत!'
कामाच्या संस्कृतीत बदलाचे संकेत
ही घटना अधोरेखित करते की जनरेशन Z आता भावना लपवत नाही, तर मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलते.