Wednesday, April 22, 2026 11:00:38 PM

LPG Price Update: युद्धविरामानंतर गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर; काय आहे तुमच्या शहरातील नवीन दर? जाणून घ्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत 14 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली घसरल्या आहेत.

lpg price update युद्धविरामानंतर गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर काय आहे तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या

LPG Price Update: जागतिक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांसाठी गॅस दरांबाबत संमिश्र वृत्त समोर आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत 14 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली घसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एप्रिल महिन्यासाठी घरगुती आणि व्यावसायिक एलपीजीचे (LPG) अद्ययावत दर जाहीर केले आहेत.

घरगुती गॅस सिलिंडर (14.2 किलो) चे प्रमुख शहरांतील दर
घरगुती गॅसचे दर गेल्या महिन्याच्या तुलनेत स्थिर असले तरी, मागील 12 महिन्यांत त्यामध्ये 60 ची वाढ झाली आहे. देशातील प्रमुख शहरांतील आजचे दर खालीलप्रमाणे आहेत:
मुंबई: 912.50
नवी दिल्ली: 913.00
पुणे: 916.00
कोलकाता: 939.00
चेन्नई: 928.50
बंगळुरू: 915.50
हैदराबाद: 965.00
पाटणा: 1,002.50

व्यावसायिक गॅसचे दर गगनाला; हॉटेल चालक संकटात
घरगुती गॅस स्थिर असला तरी व्यावसायिक सिलिंडरच्या (19 किलो) किमतींनी उच्चांक गाठला आहे. मार्चमधील 144 ची वाढ आणि 1 एप्रिल रोजी झालेली 200 ची अतिरिक्त वाढ यामुळे हॉटेल आणि ढाबा चालकांचे बजेट कोलमडले आहे.
मुंबई: 2,031.00
नवी दिल्ली: 2,078.50
चेन्नई: 2,246.50
कोलकाता: 2,208.50

ट्रम्प यांची युद्धविरामाची घोषणा आणि जागतिक परिणाम
पाकिस्तानच्या प्रस्तावानंतर अमेरिका आणि इराण 14 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत झाले आहेत. इराणने 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'मधून (Strait of Hormuz) सुरक्षित मार्ग देण्याचे मान्य केल्यामुळे जागतिक ऊर्जा संकट तूर्तास टळले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर 'व्हॅट' (VAT) आणि मालवाहतूक शुल्कामुळे विविध राज्यांतील गॅस दरांत तफावत दिसून येत आहे.

हेही वाचा - TDS Exemption: करदात्यांसाठी मोठी खुशखबर! 15G-15H ऐवजी Form 121 लागू; TDS टाळणं आता होणार सोपं

बुकिंगचे नवीन नियम आणि 'छोटू' सिलिंडरचा कोटा दुप्पट
सरकारने गॅस वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आता 'DAC' (Delivery Authentication Code) अनिवार्य केला आहे. तसेच बुकिंगसाठी शहरी भागांसाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागांसाठी 45 दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. गॅसचा पुरवठा पुरेसा असून नागरिकांनी घाबरून न जाता बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, स्थलांतरित कामगारांसाठी दिलासादायक निर्णय घेत 5 किलो वजनाच्या 'छोटू' सिलिंडरचा दैनंदिन कोटा सरकारने दुप्पट केला आहे.


सम्बन्धित सामग्री