Jaimaharashtra news

सावधान! बर्फाचे गोळे खाणं सुरक्षित ?

सध्या तापमानात वाढ झाली असून वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे सामन्य माणूस त्रस्त झाला आहे. राज्यासह मुंबईतही उन्हाच्या झळा मुंबईकरांना सहन होत नसल्यामुळे लोकं सरबत किंवा बर्फाचे गोळे खाण्यास पंसत करतात. मात्र हाच बर्फाचा गोळा तुम्हाला आजारी करू शकतो. मुंबई महापालिकेच्या हद्दीत 81 टक्के बर्फाचे नमुने दूषित असल्याचे आढळले आहेत. रस्त्यावर विक्री करण्यासाठी बसणारे गोळेवाले निकृष्ठ दर्जाचे बर्फ मोठ्या प्रमाणात वापर करताना आढळून येतात. त्यामुळे बर्फाचे गोळे सुरक्षित नसल्याने ते शरीराला घातक ठरू शकतात.

बर्फाचे गोळे असुरक्षित ?

उन्हाळा सुरू असल्यामुळे बर्फाच्या गोळ्याला चांगलीच मागणी आहे.

मात्र हा बर्फाचा गोळा आपल्या शरीरासाठी किती योग्य आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीत 81 टक्के बर्फाचे नमुने दूषित असल्याचे आढळले आहे.

त्यामुळे बर्फाचे गोळे सुरक्षित नसल्याचे समजते आहे.

मुंबईसह कल्याण डोबिंवलीमध्ये सुद्धा या प्रश्नावर चर्चा सुरू आहे.

कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांबाहेर अनाधिकृत सरबतवाले तसेच गोळेवाले निकृष्ट बर्फाचा वापर करत आहेत.

कुर्ला स्थानकावरील सरबताचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईतील सगळ्याच गोळेवाले आणि सरबतवाले कारवाई करण्याची मागणी केली होती.

मात्र कडक कारवाई न केल्यामुळे कल्याण- डोंबिवलीमध्ये सर्रासपणे  निकृष्ट दर्जेचा बर्फ वापरण्यात येत आहे.

त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेने अन्न आणि औषध प्रशासनाकडे बर्फ आणि सरबताची तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

 

 

 

Exit mobile version