सरकारचं आमच्यावर खूप प्रेम; अशा नोटीसांना भीक घालत नाही – शर्मिला ठाकरे

कोहिनूर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली असून 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. यावर राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी चांगलच उत्तर दिलं आहे. सरकारचं आमच्या खूप प्रेम असल्यामुळे आम्हाला ईडीची नोटीस आल्याचे म्हटलं आहे.
काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे.
22 ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
यासंदर्भात शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून सरकारवर घणाघात केला आहे.
सरकारचं आमच्या खूप प्रेम असल्यामुळे आम्हाला ईडीने नोटीस बजवाली आहे.
प्रेमपत्रांची आम्हाला सवय असल्याचेही शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.
अशा नोटीशांना आम्ही भीक घालत नसल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.