Wed. Jun 23rd, 2021

“या” अभिनेत्रीवर आली रेल्वे तिकीटे विकण्याची वेळ

सिनेक्षेत्रातून सध्या अनेक नवीन व्हिडिओ व्हायरल होतात. असाच एक कंगना राणावतचा सीएसएमटी स्थानकावरील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्येे कंगना सीएसएमटी स्थानकावर चक्क रेल्वे तिकीटाची विक्री करताना दिसत आहे. यामुळे तिला पाहण्यासाठी रेल्वे स्थानकावर बघ्यांची गर्दी जमली होती.

या व्हिडिओची शहानिशा केल्यावर कंगना तिच्या पंगा या आगामी चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी तिकीट विक्री करत असल्याचे समोर आले.

दरम्यान कंगनाचा पंगा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

सिनेक्षेत्रातील अनेक कलाकार आपल्या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी काहीही करू शकतात. ही बाब नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरी ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *