Tue. Oct 26th, 2021

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डांची बिनविरोध निवड

भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळाले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदी (BJP president) जे. पी. नड्डा (J P Nadda) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

त्यामुळे अमित शाह (Amit Shaha)देशाचे गृहमंत्री झाल्यापासून भाजपचे (BJP) नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार, या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.

जे. पी. नड्डा यांच्यावर २०२२ या वर्षापर्यंत अध्यपदाची जबाबदारी असणार आहे.

जे.पी. नड्डा हे नरेंद्र मोदी (Narendra Modi) तसंच अमित शहा (Amit Shaha) यांच्या मर्जीतले नेते मानले जातात.

जे. पी. नड्डा यांची लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. जे. पी. नड्डांची १७ जून २०१९ ला भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली होती.

दरम्यान भाजपच्या अनेक नेत्यांनी जे.पी. नड्डा यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने अभिनंदन केलं आहे.

कोण आहेत जे.पी.नड्डा?

  • जे.पी.नड्डा हे हिमाचल प्रदेशातून राज्यसभा खासदार आहेत.

  • २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर जे.पी.नड्डा यांना आरोग्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

  • जे.पी.नड्डा यांचं LLB पर्यंतचं शिक्षण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *