Wed. Oct 5th, 2022

चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या जॅक मा यांची एका प्रतिष्ठित यादीतून गच्छंती

‘अलीबाबा’चे संस्थापक जॅक मा यांना चीन सरकारवर केलेली टीका ही त्यांना चांगलीच महागात पडली आहे. चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या जॅक मा यांची एका प्रतिष्ठित यादीतून गच्छंती झाली आहे. जॅक मा यांना (Chinese entrepreneurial leaders) यादीतून हटवलं असून या यादीमध्ये Huawei Technologies चे रेन झेंगफेई , शाओमीचे लेई जून ( Lei Jun) आणि बीवायडीचे (BYD) वांग चाउंफू ( Wang Chuanfu) यांनी दिलेल्या योगदानाचं विशेष कौतुक करण्यात आलं आहे. अलिबाबा कंपनीने या तिमाहीतील ताज्या कमाईचा अहवाल सादर करण्यापूर्वीच ही यादी जाहीर करण्यात आली. जॅक मा यांनी २४ ऑक्टोबर रोजी चीनमधील सरकारी धोरणांवर नाराजी व्यक्त केली होती. जॅक मा शांघायमधील आपल्या एका भाषणामध्ये देशात संशोधनाला वाव मिळत नाही असं मत व्यक्त केलं असून त्यांनी जागतिक बँकींगसंदर्भात बोलताना चीन अजूनही जुन्या लोकांचा क्लब असल्यासारखे वाटते असं मत व्यक्त केलं होतं.

“आजची आर्थिक व्यवस्था ही औद्योगिकरणामुळे निर्माण झालेली आहे. आपण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी नवीन आर्थिक व्यवस्था निर्माण केली पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलं होतं शिवाय चीनची सध्याची आर्थिक व्यवस्था बदलण्याची आवश्यकता आहे,” असं जॅक मा यांनी व्यक्त केलं होतं. जॅक मा यांच्या या वक्तव्यानंतर चीनमधील सरकारी यंत्रणांनी मा यांच्या अ‍ॅण्ट समुहाच्या आयपीओला दिलेली परवानगी नाकारली आहे. या आयपीओची किंमत 37 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी असून सध्या याविरोधात चीनमधील सरकारी यंत्रणांनी एंटी-ट्रस्ट चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात जॅक मा यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.