Fri. Aug 14th, 2020

जॅकी चॅन कोरोनाच्या विळख्यात?

जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सगळीकडेच घबराट पसरलेली आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लागण झालेल्या कोरोना व्हायरसमुळे हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत. हॉलिवूडचा प्रसिद्ध मार्शल आर्ट अभिनेता जॅकी चॅन यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

या बातमीवर खुद्द अभिनेता जॅकी चॅन याने आपल्या इन्स्टाग्रामवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण पूर्णपण बरे असल्याचं त्याने पोस्टद्वारे स्पष्ट केलं आहे. ‘माझी तुम्हाला विनंती आहे की कुणीही घाबरू नका. मी उपचारांसाठी लोकांपासून दूरही नाही. तुम्हीही ठणठणीत असाल, अशा आशा करतो’ असं या पोस्टला कॅप्शन दिलं आहे.

तसंच काही दिवसांपूर्वी त्यांच्या फॅन्सनी त्यांना मास्क पाठवलं होतं. याबद्दल त्यांचे आभारही जॅकी चॅनने मानले आहेत. अशा कठीण प्रसंगी मला जगभरातून अनेक लोकांनी मास्क आणि इतर वस्तू पाठवल्या. मी त्याबद्दल तुमचे आभार मानतो. या भेटवास्तू गरजू लोकांपर्यंत पोहोचावाव्या, यासाठी अधिकृत संस्थांना संपर्क साधण्यास आपण सहकाऱ्यांना सांगितलं आहे, असं त्याने म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *