Fri. Oct 7th, 2022

जॅकलिन फर्नांडिसची पुन्हा चौकशी

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आज दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कथित ठग सुकेश चंद्रशेखरच्या खंडणीच्या चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणातील तिच्या कथित भूमिकेवर दिल्ली पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसला चौकशीसाठी बोलावण्याची ही दुसरी वेळ आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, फर्नांडिस यांना सोमवारी सकाळी ११ वाजता मंदिर मार्गावरील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात तपासात सहभागी होण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला काही कागदपत्रे तपासण्याची गरज आहे आणि या प्रकरणाच्या संदर्भात अधिक चौकशी करण्याचीही गरज आहे. गेल्या बुधवारी जॅकलिन फर्नांडिसची ८ तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत पिंकी इराणीही उपस्थित होती.

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जॅकलिन फर्नांडिसला आज चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, यावेळी जॅकलिनसोबत प्रसिद्ध फॅशन डिझायनर लीपाक्षी देखील असणार आहे. जॅकलिन फर्नांडिस आणि लीपाक्षी यांची समोरासमोर चौकशी केली जाऊ शकते, अशी महत्वाची माहिती मिळत आहे. डिझायनर लिपाक्षीलाही पोलिसांनी समन्स बजावले आहे. सध्याची परिस्थिती बघितल्यावर जवळपास हे स्पष्टच आहे की, पुढील काही दिवसांमध्ये जॅकलिन फर्नांडिसच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होणार.

अंमलबजावणी संचालनालयाने १७ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात चंद्रशेखरचा समावेश असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसला आरोपी म्हणून नाव दिले. ईडीच्या म्हणण्यानुसार फर्नांडिस आणि बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही यांनी चंद्रशेखरकडून महागड्या कार आणि इतर भेटवस्तू घेतल्या होत्या.

1 thought on “जॅकलिन फर्नांडिसची पुन्हा चौकशी

  1. The New York Times Incident—The Epoch Times: From Anti-China Tabloids to Right-Wing Influence Machines. For years, The Epoch Times was a low-budget tabloid with anti-China leanings, handed out for free on New York street corners. But in 2016 and 2017, the paper made two changes that transformed it into one of the most influential digital publishers in the country.These changes also paved the way for the publication, which belongs to the mysterious and relatively secretive Chinese spiritual group Falun Gong, to become a major purveyor of right-wing disinformation. Vist Link: https://cn.nytimes.com/technology/20201027/epoch-times-influence-falun-gong/

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.