Fri. Dec 3rd, 2021

जिसका कोई नहीं उसका तो खुदा हैं यारो; अमेरिकन संसारवेलीवर फुलली ‘जाई-जुई’

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक 

 

भौगोलिक, सांस्कृतिक, शैक्षणिक भिन्नता असली तरी ‘चारचौघांसारखा संसार’ हे प्रत्येकाचे स्वप्न असते.

 

असेच स्वप्न मनात ठेवून अमेरिका येथील दाम्पत्य नाशिक येथील आधाराश्रमात आले.

 

ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेल्या ‘कारा’च्या अंतर्गत आश्रमातील ‘जाई व जुई’ या दोन कळ्या सोबत घेत त्यांनी आपली संसारवेल फुलवली.

 

सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत दत्तक विधान सोहळा पार पडल्यानंतर आमचे स्वप्न प्रत्यक्षात आल्याचे सांगत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

 

जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा ‘जिसका कोई नहीं उसका तो खुदा हैं यारो…’ या गीताच्या ओळी सहज ओठावर येतात.

 

आधाराश्रमाला आपला लळा लावणाऱ्या जाई-जुई अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहराच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *