Sun. Mar 24th, 2019

जय महाराष्ट्र हेडलाईन्स 7.00 PM

25Shares
1. काँग्रेसनं चंद्रपुरातून विनायक बांगडे यांची उमेदवारी केली रद्द…बाळू धानोरकर चंद्रपुरातून लढणार..विनायक बांगडे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये होती नाराजी
2.  माजी खासदार सुभाष वानखेडे हिंगोलीतून काँग्रेसच्या तिकीटावर लढणार..राजीव सातव यांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार..काँग्रेसच्या नवव्या यादीत रामटेकमधून किशोर गजभिये. तर अकोल्यातून हिदायत पटेलांना उमेदवारी
3. प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लोकसभा लढवणार..काँग्रेसच्या सुशिलकुमार शिंदे आणि भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यासमोर प्रकाश आंबेडकरांचं आव्हान
4. अहमदनगरमध्ये दिलीप गांधींचे पुत्र निवडणूक लढवणार…सुजय विखेंविरुद्ध सुवेंद्र गांधी उतरणार निवडणुकीच्या रिंगणात…
5. कोल्हापुरमध्ये महायुतीचा आज पहिला महामेळावा…मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरेंनी घेतलं अंबाबाईंच दर्शन…
6. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा प्रचार शुभारंभ कराडमधून.. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, उदयनराजे भोसलेंनी घेतलं यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाचं दर्शन..
7. राष्ट्रवादीच्या कुरघोडीला कंटाळून सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी दिला राजीनामा, निंबाळकर सोमवारी भाजपामध्ये करणार प्रवेश…
8. नाशिक जव्हार रोडवर तोरंगणा घाटात खासगी बस दरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू…अपघातात 40 हून अधिक जण जखमी…सर्व प्रवासी गुजरातचे…शिर्डीहून परतत असताना झाला अपघात…
9. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर.. जेवणामध्ये सापडल्या अळ्या.. विद्यार्थ्यांच्या तब्येतीचा प्रश्न ऐरणीवर..
10. वॉर्नरच्या दमदार अर्धशतकामुळे हैदराबादचं कोलकात्यासमोर 182 रन्सचं आव्हान… आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचीही दमदार सुरूवात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *