पत्रकार हा समाजाला दृष्टी दाखवण्याचं काम करतो- प्रसाद काथे

पत्रकार हा समाजाला दृष्टी दाखवण्याचं काम करतो, असे मत जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथे यांनी व्यक्त केले.
सध्याचा धावपळीत पत्रकारिता देखील बदलत आहे. त्यामुळे वेळेत पत्रकारांनी आपलं काम करून आरोग्याकडे देखील लक्ष द्यायला हवं, असे आवाहन प्रसाद काथे यांनी केलं.
तसेच यावेळी सोशल मीडियाचा होणाऱ्या दुष्परिणामांवर देखील त्यांनी प्रकाश टाकला.
पत्रकार दिनानिमित्त नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत,पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील,जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान भारतकुमार राऊत यांनी देखील बदललेल्या पत्रकारितेवर प्रकाश टाकला.
पत्रकाराला रोज नवी पाटी घेऊन काम करावं लागतं. हीच पत्रकार क्षेत्राची जमेची बाजू असल्याचं मत भारत कुमार राउतांनी व्यक्त केलं.
पत्रकार क्षेत्रात कोणीच नवीन किवा जुना नसतो. त्यामुळे समाजाच्या हिताची भूमिका घेत पत्रकारानी काम करावं असे आवाहन, भारतकुमार राऊत यांनी केलं.
संपादक प्रसाद काथे आणि ज्येष्ठ पत्रकार यांच्या हस्ते पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.