Sat. Jul 31st, 2021

‘जय महाराष्ट्र इमपॅक्ट’, परमिट रुमला परवानगी देण्याऱ्या ग्रामसभेची सभा रद्द

जय महाराष्ट्रच्या बातमीचा इमपॅक्ट झाला आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलने बातमी चालवल्यानंतर बातमीचा इमपॅक्ट पाहायला मिळाला आहे.

परमिट रूम, बिअर बार, वाइन शॉपला परवाने देण्यासाठी घेण्यात येणारी ग्रामसभा जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर मारुंजी ग्रामपंचायतीने तहकूब केली.

मारुंजी ग्रामपंचायतीने परमिट रूम, बिअर बार, वाइन शॉपला परवाने देण्यासाठी ग्रामसभेचं आयोजन केलं होतं. परंतु जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीवर बातमी लागताच ही सभा तहकूब करावी लागली.

परमिट रूम, बियरबार, वाईन शॉपला नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलं होतं.

हा संतापजनक प्रस्ताव सुशिक्षित म्हणवणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी ग्रामपंचायतीचा होता.

या मारुंजीत हिंजवडी भागात थोड्या प्रमाणात आयटी हबचा काहीसा भाग ही येतो. अशा या मारुंजी ग्रामपंचायतीने हा प्रताप मांडला होता.

मागे 26 जानेवारीच्या ग्रामसभेत या विषयाला विरोध झाला होता. यानंतर आज यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *