Fri. Jul 30th, 2021

#MahavirJayanti जैन धर्माचे 24वे तीर्थंकार ‘महावीर’ यांची जयंती

‘लाखो शत्रूंच्या विरोधात जिंकण्यापेक्षा स्वत:च्या वागणुकीत जिंकण्याला महत्व आहे’ असे सांगणारे वर्धमान महावीर यांची आज जयंती आहे. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकार आहेत. हा सण शेवटचे तीर्थंकार महावीर यांच्या जन्मनिमित्त साजरा करण्यात येतो. जैन धर्मात ऋषभदेव हे पहिले तीर्थंकार असून महावीर यांच्या जन्मानंतर मोठ्या प्रमाणावर जैन धर्माच्या प्रसाराला सुरुवात झाली. ‘स्वत: शुद्ध राहा, तरच इतरांना शुद्धतेचा धडा देऊ शकतात’ हा जैन धर्माचा मंत्र आहे.

महावीर हे जैन धर्माचे 24 तीर्थंकर –

महावीर जैन धर्माचे प्रवर्तक होते.

या धर्माच्या सिद्धांताच्या स्थापनेमध्ये महावीर यांचा मौल्यवान योगदान आहे.

बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील कुंडलगामा येथे महावीर यांचा जन्म झाला.

शुक्लपक्षाच्या चैत्र महिन्यात त्यांचा जन्म झाल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे एप्रिल महिन्यातच महावीर जयंतीला फार महत्त्व आहे.

या सणाला गोरगरीबांना आवश्यक वस्तू आणि दानधर्म करणे पुण्याचे मानले जाते.

जैन धर्मियांच्या मंदीरामध्ये यावेळी कुटुंबिय एकत्र येऊन मूर्तींची पूजा करतात.

‘अहिंसा’ हा जैन धर्मियांचा मूळ आधार मानला जातो.

अहिंसा बरोबरच त्याग, प्रेम हा जैन धर्माचा मूळ उद्देश असून याबद्दल जनजागृती करण्याच प्रयत्न सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *