Fri. Aug 12th, 2022

जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद खानला दिल्लीत अटक

पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला. यामध्ये 41 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए- मोहम्मद या संघटनेने घेतली. त्यानंतर दहशतवादाला संपवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने आज जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद खान याला अटक केली आहे. सज्जाद खानला झालेली अटक हे सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जात आहे.पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून जैश-ए- मोहम्मद या संघटनेला संपवण्यासाठी जागतीक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

कोण आहे हा सज्जाद खान ?

जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद खान हा पुलवामा हल्ल्यातील सूत्रधार मुदस्सिर याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो.

भीषण हल्ल्याचा सूत्रधार मुदस्सिर अहमद खान याचा सुरक्षा दलांनी ११ मार्च रोजी त्राल येथे चकमकीत खात्मा केला.

मुदस्सिर हा पुलवामा येथील त्रालच्या मिर मोहल्ल्यात राहत होता.

२०१७ मध्ये त्याने जैश- ए – मोहम्मदमध्ये शिरकाव केला होता.

स्फोटातील गाडी आणि स्फोटके यांची जमवाजमव मुदस्सिर याने केली होती.

दिल्लीतील सज्जाद खान हा मुदस्सिरच्या संपर्कात असल्याचे सुरक्षा दलांच्या तपासातून उघड झाले होते.

सज्जाद खान याचे दोन भाऊ दहशतवादी संघटनेत असल्याची माहीती आहे.

सज्जाद खानला झालेली अटक हे सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.